घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. देव्हाऱ्याची जागा हा घराचा अत्यंत शांत भाग असला तर तेथे दैवी शक्ती भरून राहते.
- ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे, देव्हाऱ्याची योग्य जागा ईशान्य कोपऱ्यातच असावी.
- वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते.
- ईशान्य कोपरा शक्य नसल्यास, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे देव्हारा ठेवला तरी हरकत नाही.
- देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये, असल्यास अति पीडा उद्भवण्याचा संभव असतो.
- देव्हारा शयनगृहात नसावा. शक्य नसल्यास देव्हाऱ्यासमोर लाकडी पार्टिशन किंवा पडद्याची व्यवस्था करावी.
- देव्हाऱ्याच्या वर किंवा खाली शौचालय अजिबात नसावे.
- देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नये; एक चौथरा तयार करावा किंवा संगमरवरी/लाकडी मांडणी करावी.
- काचेचा किंवा अक्रिलिक देव्हारा टाळावा. कळस असावा किंवा नसावा याविषयी नियमांचे पालन करावे.
Note: देव्हाऱ्याची जागा बदलत असताना नेहमी आपल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा सल्ला घ्यावा.